मीखाला परमेश्वराचे शब्द ऐकू आले. योथाम, आहाज व हिज्कीया यांच्या काळात हे घडले. हे सर्व यहूदाचे राजे होते. मीखा मोरेशेथचा होता. मीखाने शोमरोन व यरुशलेम यांच्याविषयी पुढील दृष्टांन्त पाहिले.
का? ह्याला कारण याकोबचे पाप, तसेच इस्राएल राष्ट्राची दुष्कर्मे आहेत.याकोबने पाप करण्याचे कारण काय? त्याला कारणीभूत आहे शोमरोन. यहूदात उच्चस्थान कोठे आहे? यरुशलेममध्ये.
म्हणून मी शोमरोनला भूमीवरील खडकांच्या ढिगाप्रमाणे करीन. ती द्राक्ष लागवडीच्या जागेप्रमाणे होईल. शोमरोनचे चिरे मी दरीत ढकलून देईल. आणि तिथे पायांखेरीज काहीही शिल्लक ठेवणार नाही.
तिच्या सर्व मूर्तीचे तुकडे तुकडे केले जातील. तिच्या वेश्येची संपत्ती (मूर्ती) आगीमध्ये भस्मसात होईल. तिच्या सर्व खोट्या दैवतांच्या पुतळ्यांचा मी नाश करीन. का? कारण शोमरोनने माझ्याशी विश्वासघात करुन सर्व धन मिळविले.म्हणून माझ्याशी एकनिष्ठ नसलेल्या लोकांमार्फत तिची संपत्ती घेतली जाईल
शाफीरमध्ये राहणारे लोकहो, तुम्ही नग्न आणि लज्जित होऊन आपल्या वाटेने फिरता. सअनानवासी बाहेर पडणार नाहीत. बेथ-एसलामधील लोक शोक करतील. आणि त्या शोकाचे कारण (आधार) तुम्ही असाल.
म्हणून केसा कापा, मुंडन करा.का? कारण तुम्हाला प्रिय असलेल्या मुलांसाठी तुम्ही शोक कराल. गरुडा प्रमाणे तुम्ही स्वत:चे डोक्याचे मुंडन करुन कराल. गरुडा प्रमाण तुम्ही स्वत:चे डोक्याचे मुंडन करुन घ्या आणि दु:ख प्रगट करा. का? कारण तुमच्या मुलांना तुमच्यापासून दूर नेले जाईल.